माहुली : येथे १४ एप्रिल राेजी नागिरकांचे काेराेना लसीकरण केल्यानंतर पुन्हा लसीकरण न करण्यात आल्याने अनेक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित हाेते. यासंदर्भात २७ मे राेजीच्या अंकात वृत्त प्रकाशित हाेताच गावात दुपारी आराेग्य विभागाने लसीकरण कॅम्पचे आयाेजन करून ५९ जणांना लस देण्यात आली.
यावेळी गावातील ४४ वर्षे वयावरील ५९ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. माहुली या गावात तीन वेळा कोरोना आजाराची चाचणी झाली. मात्र, लसीचा कॅम्प एकदाच १४ एप्रिलला झाला हाेता. कोरोना महामारी प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावून प्रत्येक गावात मोफत चाचणी करीत आहेत, तसेच मोफत लस देत आहेत. माहुली या गावात तीन वेळा कोरोना चाचणी झाली. त्यामधून जवळपास १० ते १५ नागरिक पाॅझिटिव्ह निघाले. त्यांना गृहविलगीकरणात ठेवले. १४ एप्रिलला ५० नागरिकांना लस दिल्यानंतर गावाकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने हजाराे ग्रामस्थ लसीपासून वंचित हाेेते, ज्या नागरिकांनी प्रथम डोस घेतले त्यांना ४५ दिवस झाले, तर त्यांना दुसरा डोस कधी, यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच आराेग्य विभागाने दखल घेत गावात लसीकरण केले. याला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.