पांडवउमरा : वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्या ह्यएकाच ग्रामसचिवाकडे पाच गावांच्या कामाचा बोजाह्ण या मथळयाखाली १४ जून २0१४ रोजी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच वाशिम पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी बदरखे यांनी तातडीने माने नामक ग्रामसेवकाकडील पाच गावातील अतिरिक्त प्रभार काढण्याची कारवाई केली आहे.वाशिम पंचायत समिती अंतर्गतच्या ग्रामसचिवांकडे समान गावांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली होती. काही ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासल्या गेला होता. याबाबत ह्यलोकमतह्णने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तान ेपंचायत समिती प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. याची दखल घेत प्रभारी गटविकास अधिकारी बदरखे यांनी ग्रामसचिवांकडील अतिरिक्त प्रभार काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे.माने नामक ग्रामसेवकाकडील पाच गावातील अतिरिक्त प्रभार काढताना तांदळी शेवई-जनुना या गावांकरिता म.वा.कांबळे या ग्रामसचिवाला रुजू होण्याचे आदेश सुद्धा बदरखे यांनी दिले आहेत. माने नाम ग्रामससिवाकडे केवळ एकच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्वाला हरताळ फासला जात होता.शासनाच्या कल्यानकारी योजना गावपातळीवर पोहचवण्यासाठी आता पांउवउमरा सावंगा जहाँगीरच्या ग्रामसचिवाला बर्यापैकी वेळ मिळणार असल्याची माहिती आहे. पाच गावाचा कारभार पाहता पाहता एकाच सचिवाची दमछाक होत होती. शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कामाचे समान वाटप होणे आवश्यक असताना अनेक ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावाचा कारभार असल्याने उर्वरित ग्रामसचिवांकडे प्रकरणाच्या पेंडीगची संख्या वाढणार असल्याचे माहिती आहे. तीन ग्रामसचिवाना कार्यालयीन कामकाजासाठी घेतले कसे या प्रश्नाचे उत्तर मात्र सध्यातरी अनुत्तरीय आहे.
अखेर ग्रामसचिवांकडील अतिरिक्त प्रभार काढला
By admin | Published: June 19, 2014 9:48 PM