अकोला ते हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मेडशीला महामार्गातून वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. याप्रकरणी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांनी आमदार अमित झनक यांना निवेदन देत महामार्गातून मेडशीला वगळण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी केली होती. याची दखल घेत झनक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यप्रवाहातून मेडशी बाहेर पडू नये, याकरिता आमदार अमित झनक व सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांनी परिश्रम घेऊन अखेर हा प्रश्न मार्गी लावला. लवकरच मेडशी जंक्शनचे काम सुरू होणार असून, कार्यकारी अभियंता जवादे यांनी पाहणी करून त्याची आखणी करण्याचे काम सध्या सुरू आहे. यावेळी सरपंच जमीर शेख गणीभाई, उपसरपंच धीरज मंत्री, ग्रामपंचायत सदस्य रमजान गवरे, अमोल तायडे, ज्ञानेश्वर मुंडे, जगदीश राठोड ,उमेश तायड़े, प्रशांत घुगे, मूलचंद चव्हाण, गजानन झ्याटे, माजी ग्रा. पं. सदस्य मो मजहर, प्रसाद पाठक, संजय भागवत, विनोद तायडे, दीपक वानखेडे आदी उपस्थित होते.
अखेर मेडशी गावाला जंक्शन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:47 AM