विद्यार्थ्यांची गैरसोय टळली : वाहक, चालकांचा सत्कारलोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : गत काही महिन्यांपासून बससेवेच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखेर ३० जुलै रोजी दिलासा मिळाला आहे. मोहजा इंगोले मार्गे रिसोड ते भोकरखेड ही बसफेरी ३० जुलैपासून सुरू झाली असून, गावकºयांनी वाहन चालक व वाहकाचा सत्कार केला.रिसोड येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहजा इंगोले व भोकरखेड येथील शाळकरी विद्यार्थी व गावकºयांसाठी बसफेरी नसल्याने प्रचंड गैरसोय होत होती. रिसोड, मोहजा इंगोले, भोकरखेड अशी बसफेरी सुरू करण्याची मागणी मोहजा इंगोलेचे सरपंच घनश्याम मापारी व रिसोड येथील शिवाजी शिक्षण संस्थेने रिसोड आगार व्यवस्थापकांकडे केली होती. सदर मागणीची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी ३० जुलै पासून रिसोड ते भोकरखेड मार्गे मोहजा इंगोले अशी नियमित बस फेरी सुरू केली आहे. मंगळवारला सकाळी ११ वाजता मोहजा इंगोले गावात बस येताच सरपंच घनशाम मापारी व गावकºयांनी बसचे चालक व वाहकाचे श्राल श्रीफळ देवुन स्वागत केले. यावेळी कैलास पाटील, शेषराव जाधव, कैलास जाधव, बंडू मोरे, संजय इंगोले, प्रभाकर पाटील, जगन इंगोले, रवि जाधव, मधुकर ईगोले, राजु जाधव, भुजंग सरकटे, शिवाजी इंगोले, विजय हुंबे, भागवत कालापाड, दत्तराव मापारी, गजानन शिंदे यांच्यासह शाळकरी विद्यार्थी, गावातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखेर रिसोड ते भोकरखेड बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 2:55 PM