भर जहागीर बस थांब्यावर सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. एका बाजूचा रस्ता पूर्ण केला, तर दुसरी बाजू करताना येथील बस थांब्यावर वीस ते तीस फुटांचा रस्ता सिमेंट काँक्रिट करण्यापासून ‘जैसे थे’ ठेवला. विशेष म्हणजे, या रत्याची रुंदी जवळपास चाळीस फूट असून, दोन्ही बाजूला अंदाजे दोनशे मीटर सिमेंट रस्ता केल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत, परंतु ऐन बस थांब्यावर एका बाजूला तीस बाय वीस फुटांच्या रस्त्याचे काम खोळंबल्याने, या रस्त्याला एक ते दीड फुटाची कपार झाल्याने वेगाने येणारी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचा रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती निर्माण झाली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. याची दखल घेत, १३ जुलै रोजी दुरुस्ती करण्यात आली.
अखेर ‘त्या’ रस्त्याची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:46 AM