मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा येथील चार शेतकरी गतवर्षी धरणाच्या सांडव्यात वाहून गेले होते़, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १८ फेब्रुवारी रोजी शासनाच्या वतीने प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला . गतवर्षी जास्त पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला असता मोतसावंगा ओसंडून वाहत असताना धरणांच्या सांडव्यात दिलीप वाघमारे, गोपाल जामकर,भाऊराव खेकडे,महादेव इंगळे हे शेतकरी वाहून गेले होते . यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. शासनाची मदत मिळावी यासाठी चारही शेतकऱ्यांची कुटुंब गत सहा महिन्यापासून तहसील कार्यालयात चकरा मारुन कंटाळून गेले होते; मात्र यांची दखल कुठल्याही अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती . ही बाब लक्षात घेऊन खा. भावनाताई गवळी, माजी जि. प. सदस्य विश्वास गोदमले, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास सुर्वे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे निराधार महिला रत्नमाला दिलीप वाघमारे, कल्पना गोपाल जामकर, वंदना भाऊराव खेकडे व सुमन महादेव इंगळे यांना प्रत्येकी एक लाख असे एकूण चार लाख रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते, व मोतसावंगा सरपंच उपस्थित होते.
पुरात जीवितहानी झालेल्या शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 5:19 AM