शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना खासदारांकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:24 PM

हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतक कुटूंबियांना सांत्वनपर भेट देताना खासदार भावना गवळी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : बुलडाणा जिल्ह्यातील  ब्राम्हण चिकना गावानजिक २३ सप्टेंबरला झालेल्या अपघातात शिरपूर येथील दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतकाच्या कुटूंबियांना सांत्वनपर भेट देताना खासदार भावना गवळी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत केली.२३ सप्टेंबरच्या या अपघातात भर जहाँगीर येथील ज्ञानेश्वर डोंगरे (१९), अरूण कांबळे (२२), राजू कांबळे (२३) तसेच शिरपूर जैन येथील प्रविण कांबळे (२५) व गणेश बांगरे (३२) असे पाच जण ठार झाले; तर अन्य १३ जण जखमी झाले होते. दरम्यान, या अपघातात घरातील कर्ते पुरूष संपल्याने मृतकांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा पेच निर्माण झाला. खासदार भावना गवळी यांनी यापूर्वी भर जहॉगीर येथे मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधिसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते तसेच जखमींच्या उपचाराचा काही खर्च उचलण्याचे आश्वासनही दिले. १ आॅक्टोबरला  रात्री ८.३० वाजताच्या सुमारास खासदार गवळी यांनी शिरपूर येथे   सांत्वनपर भेट दिली. यावेळी मृतक प्रवीण कांबळे याच्या आईला तसेच गणेश बांगरे यांच्या पत्नीला प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प. सभापती सभापती विश्वनाथ सानप, अशोकराव अंभोरे, विजय अंभोरे, दिलीप विश्वंभर, दिनकर पुंड, गणेश अंभोरे, दिलीप विश्वंभर, श्याम दीक्षित, कैलास भालेराव, गोपाल वाढे, सुलतान भाई, असलम खा पठाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमBhavna Gavliभावना गवळीShirpur Jainशिरपूर जैन