................
जयपाल वैद्य
वाशिम : शहरातील नालंदानगर येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक जयपाल गोमाजी वैद्य यांचे मंगळवार, ९ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातू, सुन, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
..............
बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी
वाशिम : एस.टी. महामंडळाच्या वाशिम, रिसोड आगारातील अकोला, शिरपूर मार्गावरच्या काही दैनंदिन बसफेऱ्या अनियमित आहेत. बसफेऱ्या नियमित सोडण्याची मागणी विश्वजित कांबळे यांनी बुधवारी केली.
..................
प्रभारींच्या खांद्यावर विकासाची भिस्त
मालेगाव : तालुक्यात पटवारी, कृषी सहायक, सचिव यासारख्या महत्त्वाच्या पदांवर प्रभारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यावर गाव विकासाची भिस्त आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी राजाराम टोंचर यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
................
बेटी बचाओ मोहिमेसाठी जनजागृती आवश्यक
मेडशी : शासनाने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक जनजागृती व्हावी, अशी मागणी अंबादास खाडे यांनी १० फेब्रुवारी रोजी केली.
.....................
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतिक्षा
वाशिम : शासनाच्या विविध योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी बुधवारी निवेदनाव्दारे केली.