लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : शॉर्ट सर्किटमुळे तालुक्यातील भर जहागीर येथील देऊबाई निवृत्ती सानप यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून वैरणीसह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना २१ जानेवारीला घडली.भर जहॉगीर परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती असून, जनावरांच्या चाºयाची टंचाई आहे. जनावºयांची चाºयाची साठवणूक म्हणून देऊबाई सानप व मुलगा समाधान सानप यांनी चार हजार पेंढी गवत, तुरीचे कुटार दोन ट्राली, सोयाबीन कुटार सहा ट्राली अशाप्रकारे जनावरांचा चारा शेतात ठेवला होता. या वैरणीलगतच शेतीपयोगी साहित्यदेखील ठेवले हाते. २१ जानेवारीला सायंकाळी ४ वाजतादरम्यान अचानक सुसाट्याचा वारा सुटला आणि विद्युत खांबावरील जिवंत तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन वैरण तसेच शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतातील विहिरीतून पाणी आग विझविण्यासाठी घेता आले नाही. या आगीत ५० हजारांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तलाठी रवीन्द्र खंडारे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून, नुकसानभरपाईसंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी देऊबाई सानप यांनी २२ जानेवारी रोजी केली.
भर जहॉगीर येथे शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 5:30 PM