मेडशी (वाशिम), दि. १८-: उमरवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत नगदी रकमेसह साडेसात लाखाचे नुकसान झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान घडली. तलाठय़ांच्या पंचानाम्यानुसार, उमरवाडी येथील रहिवासी पांडुरंग अमृता पवार यांच्या राहत्या घराला १७ फेब्रुवारी रोजी ८.३0 वाजताच्या दरम्यान इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खक झाले. टीव्ही, ऑईल इंजिन, कपाट व कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीेचे दागिने, बँकेचे पासबुक, राशनकार्ड, मुलाचे शाळेचे कागदपत्रे, आधारकार्ड, ६ क्विंटल ज्वारी, दोन क्विंटल गहू, धान्य दाळ, तांदूळ, घरातील सर्व भांडे व कपडे, रोख साठ हजार रुपये आदी साहित्य जळून खाक झाले. या आगीत साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या आगीत जीवितहाणी झाली नाही. या घटनेमुळे पवार कुटुंबीय हादरले असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली.
मेडशी येथे घराला आग; सात लाखाचे नुकसान
By admin | Published: February 19, 2017 2:02 AM