कारंजा: येथील की.न.महाविदयालयासमोरील असलेल्या नरेंद्र जिनिंग परीसरातील प्रिंटेक्स इंडस्ट्रिडला शाॅट सर्कीटमुळे आग लागून अंदाजे ७ काेटी रूपयाचे नुकसान झाल्याची घटना ृ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली. कारंजा येथील प्रदिप चवरे व अमोल चवरे हे एकत्रपणे नरेंद्र जिनिंग परीसरात प्रिंटेक्स इंडस्ट्रिड जिनिंग नावाने व्यवसाय करतात. प्रिंटेक्स इंडस्ट्रिडला या ठिकाणी कापुस व सुत तसेच कच्चा असलेल्या मालाला १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान शाॅट सर्कीटमुळे आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्याबरोबर उपस्थित कर्मचा-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेच कारंजा नगरपरीषद तसेच वाशिम व मंगरूळपीर येथील अग्निशामन यंत्रणेला पाचारण करण्यात आले हाेते. आग आटोक्यात येण्यासाठी जवळपास ३ तास जास्त वेळ लागला. या आगीत सुत व कच्चा माल असा एकुण ७ काेटीरूपयाचे नुकसान झाल्याचे मालक प्रदिप चवरे व अमोल चवरे यांनी दिली.
कारंजा जिनिंग फॅक्टरीला आग; ७ काेटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2021 7:39 PM