शाळेची पहिली घंटा वाजली; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 2:44 PM
वाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांची पहिली घंटा बुधवार, २६ जून रोजी वाजली असून पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांची पहिली घंटा बुधवार, २६ जून रोजी वाजली असून पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.उन्हाळ्यातील दीर्घ सुट्टीनंतर बुधवारपासून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या. वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी संस्थेच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठव्या वर्गात १.५३ लाख विद्यार्थ्यांची संख्या आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी काही ठिकाणी लेझीम पथकाने विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. शिरपूर येथे प्रभातफेरीदरम्यान बैलबंडीने लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंददायी वातावरण निर्मिती दिवस म्हणून शाळेमध्ये साफसफाई, शाळेच्या प्रांगणात स्वच्छता आणि रांगोळी घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागतामुळे आणि प्रसन्न वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी वाढेल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला.