वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा प्रथम स्थानी आहे. वाशिम जिल्ह्याचा निकाल ८९.५० टक्के असून, गतवर्षी ८७.३७ टक्क्यासह अमरावती विभागात वाशिम जिल्हा दुसºया स्थानी होता. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१आहे.
जिल्ह्यात यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २० हजार ५२१ विद्यार्थ्यांची नावनोंदणी झाली होती. यापैकी २० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ११ हजार ६१३ मुले व ८ हजार ७९९ मुलींचा समावेश आहे. यापैकी १८ हजार २६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये १० हजार १९९ मुले व ८ हजार ७० मुलींचा समावेश आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.८२ तर मुलींची टक्केवारी ९१.७१ आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल रिसोड तालुक्याचा ९२.८६ टक्के तर सर्वात कमी निकाल मालेगाव तालुक्याचा ८५.४५ टक्के लागला आहे. वाशिम तालुक्यातील ६४ शाळांमधून ४९६० विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. यापैकी ४९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४३७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.७५ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ३४ शाळांमधून २६०८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २५९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २२२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८५.४५ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ५७ शाळांमधून ४५३२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ४४९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४१७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९२.८६ अशी आहे. कारंजा तालुक्यातील ५९ शाळांमधून ३४३४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ३४२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३०२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.२६ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यातील ४३ शाळांमधून २७७२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २७६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २५२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ९१.४० अशी आहे. मानोरा तालुक्यातील ४० शाळांमधून २२१५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी २२०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याची टक्केवारी ८८.६६ अशी आहे.
जिल्ह्यातील ४९२४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आहेत. प्रथम श्रेणीत ७४९५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ५१२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत ७२९ विद्यार्थी आहेत.
पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५१.७५ टक्के
वाशिम जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेतील पुनर्परिक्षार्थींचा निकाल ५१.७५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १२०६ विद्यार्थ्यांनी पुनर्परिक्षार्थी म्हणून नोंदणी केली होती. यापैकी १२०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ६२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ५१.७५ अशी आहे.