लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल मंगळवार, ३० मे रोजी जाहीर झाला. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा (९४.१९ टक्के) लागला आहे. गतवर्षीपेक्षा तो ३.१९ टक्क्यांनी अधिक आहे, हे विशेष. तालुक्यामध्ये ३२ उच्च माध्यमिक शाळा आहेत. सर्व शाळांमधून एकंदरित ४२८४ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होत्. त्यापैकी ४०३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; तर १०० टक्के निकाल लागणाऱ्या महाविद्यालयांमध्ये रेणूकामाता ज्युनिअर कॉलेज गोवर्धन, मॉर्डन सायन्स कॉलेज कंकरवाडी व राजर्षी शाहू ज्यूनिअर कॉलेज निजामपूर या ३ महाविद्यालयांचा समावेश आहे; तर सर्वात कमी निकाल बाबासाहेब धाबेकर ज्युनिअर कॉलेज, येवतीचा (५० टक्के) लागला आहे. तालुक्यातील शाळांमध्ये श्री शिवाजी ज्यु. कॉलेज रिसोड ९५.७९ टक्के, श्री शिवाजी ज्यु कॉलेज ९८.८८ टक्के, श्री डी.सी.गोळे ज्यू कॉलेज केनवड ९९.२५ टक्के, श्री बाबासाहेब ज्यू. कॉलेज रिसोड ८७.५० टक्के, पंडित नेहरू ज्यू कॉलेज चिखली कवठा ९७.३९ टक्के, भारत माध्य कन्या शाळा रिसोड ९६.४२ टक्के, श्री शिवाजी ज्यू.कॉलेज रिठद ७४ टक्के, बाबासाहेब धाबेकर ज्यू. कॉलेज केशवनगर ९३.७० टक्के, भारत उच्च माध्यमिक शाळा रिसोड ९७.६१ टक्के, शेषराव पाटील उच्च्माध्यमिक शाम लेहणीकर ९६.१९ टक्के, श्री शिवाजी उच्चमाध्यमिक शाळा वाकद ९७.०१ टक्के, श्री शिवाजी उच्चमाध्यमिक शाळा हराळ ९६.५५ टक्के, इंदिरा गांधी उच्चमाध्यमिक शाळा गोभणी ९७.०२ टक्के, श्री शिवाजी उच्चमाध्यमिक शाळा कोयाळी ९५.६० टक्के, श्री सखाराम महाराज ज्यू कॉलेज लोणी ९९.४४ टक्के, श्री शिवाजी ज्यू. कॉलेज भरजहाँगीर ९८.१८ टक्के, प्रियदर्शनी उच्चमाध्यशाळा आसेगाव पन ९४.४७ टक्के, ज्ञानेश्वर उच्च माध्य शाळा मांडवा ९५.४६ टक्के, लक्ष्मीनारायण बाजड उच्च माध्य शाहा नेतन्सा ९८.८१ टक्के, संत तुकाराम महारराज उच्चमाध्य शाळा कंकरवाडी ९८.११ टक्के, श्री बाबासाहेब धाबेकर उच्चमाध्य शाळा नंधाना ९७.५६ टक्के, श्री गोपाळेश्वर महाराज कला महाविद्यालय महागाव ९५.२३ टक्के, स्वामी विवेकानंद उच्च माध्य शाळा व्याड ९२.३० टक्के, पार्वतीबाई नागरे उच्च माध्य शाळा शेलू खडसे ९३.२४ टक्के, विजयराव देशमुख ज्यू.कॉलेज लिंगापेन ९७.२६ टक्के, डॉ. अल्लामा उर्दु ज्यु. कॉलेज रिसोड ८४.७२ टक्के, संत गाडगे महाराज उच्च माध्य शाळा मोठेगाव ९२.६८ टक्के, श्री बाबासाहेब धाबेकर कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड ६८.७५ या शाळांचा समावेश आहे.
रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम
By admin | Published: May 31, 2017 2:08 AM