महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने मुंबई येथे येत्या २० जानेवारी रोजी राज्यस्तरीय कनिष्ठ गट अजिंक्यपद मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी खेळाडूंची निवड करण्याकरिता ९ जानेवारी रोजी वाशिमच्या जिल्हा क्रीडा संकुलावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय शिंदे होते. सचिव अनिल बोंडे, उपाध्यक्ष बाळासाहेब गोटे, सतीश जाधव, हृषीकेश इंगळे, गफ्फूर पप्पुवाले, प्रदीप बोडखे, गणेश शिंदे, वैभव झामरे, कलीम मिर्झा, चेतन शेंडे आदींची उपस्थिती होती.
१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत २० वर्षांआतील मुलांमधून तन्मय निकस, संकेत कोठेकर, २०० मीटरमध्ये १६ वर्षांआतील रोशन खिल्लारे, सुनील चव्हाण, ५ किलोमीटर धावण्यात गौरव जाधव, सचिन खोरणे, ६०० मीटरमध्ये शेरसिंग चव्हाण, नीलेश गव्हाणे, १० किलोमीटर धावण्यात महेश वाकुडे, संघर्ष खिल्लारे, १० किलोमीटर चालण्यात साक्षी घुले, गायत्री चौधरी. लांब उडीमध्ये स्नेहा गव्हाणे, पूनम खांदवे. गोळाफेकमध्ये प्रशांत चव्हाण, अ. फरहान. थाळीफेकमध्ये प्रशांत चव्हाण यासह पार्थ हेंबाडे आणि ओम गोटे या खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. हे खेळाडू राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता पात्र ठरले आहेत.