लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे. त्यांनी १२५ कोर्स पूर्ण केले आहेत. अ. अजीज अ. सत्तार यांचा ई लर्निंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणार्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र स्तरावर १0 क्रमांक लागत असून, अमरावती विभागातून ते प्रथम आहेत.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये नगर परिषदेला पुरस्कार प्राप्त झाला. अभियानाचा पुढचा टप्पा स्वच्छ सर्वेक्षण २0१८ साठी वाशिम नगर परिषदेने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न सुरु केलेत. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानाचे अधिकृत पोर्टल ‘स्वच्छभारत.क्लाऊडअप.नेट’ या पोर्टलवर स्वच्छताविषयी विविध शहरांनी केलेल्या प्रयत्नांचे रोल मॉडेल कोर्स उपलब्ध आहेत. या पोर्टलवरील कोर्स पूर्ण करण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार सर्व नगर परिषद कर्मचार्यांना अनिवार्य केले आहे. त्याकरिता मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी नगर परिषद वाशिमच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन संगणक अभियंता राहुल कंकाळ यांना नगर परिषद कर्मचार्यांना सदर प्रणालीचे प्रशिक्षण देण्याबाबत आदेशित केले होते. नगर परिषद कर्मचारी व नगर परिषद अधिनस्थ शाळांचे शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले. आतापर्यंत वाशिम नगर परिषदेच्या विविध विभागातील एकूण ३0 कर्मचार्यांनी ई लर्निंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला. वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांचा अमरावती विभागामधून प्रथम; तर महाराष्ट्र स्तरावर दहावा क्रमांक लागतो. तसेच अ. अजिज यांनी कर वसुली विभागातील संतोष किरळकर, साहेबराव उगले, शिवाजी इंगळे, मुन्ना खान व इतर सर्व कर्मचार्यांकडूनही यशस्वीरीत्या ई लर्निंग कोर्स पूर्ण करून घेतला. त्यांच्या या कार्याचे वाशिम शहरात सर्वच स्तरातून कौतुक केल्या जात आहे.
स्वच्छ भारत अभियान ई-लर्निंग कोर्समध्ये वाशिमचे करनिरीक्षक विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 1:49 AM
वाशिम: वाशिम नगर परिषदेचे कर निरीक्षक अ.अजीज अ. सत्तार यांनी अमरावती विभागामधून सर्वात जास्त ई लर्निंग कोर्स पूर्ण करून वाशिम नगर परिषदेचे नाव स्वच्छ भारत पोर्टलवर अधोरेखित केले आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्रात दहाव्या क्रमांकावर १२५ कोर्स केले पूर्ण