लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मत्स्य व्यवसायाकरिता मासेमारांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने किसान क्रेडीट कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती वाशिमच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्त अमिता जैन यांनी गुरूवारी दिली. वाशिमसह राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.केंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड ही सुविधा आता मासेमारांना मत्स्य व्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सुरु केली आहे. या योजने अंतर्गत मत्स्य शेतकऱ्यांना मत्स्य संवर्धनासाठी बीज, खाद्य, खते, प्रो-बायोटीक्स, तलावांचे नुतनीकरण, मत्स्यबीज केंद्रांसाठी आवर्ती खर्च, मासळी महिला विक्रेता यांच्याकरीता खेळते भाग भांडवल, तलाव ठेक्याने घेताना तलावाच्या भाडेपट्टीच्या पूर्ततेसाठी अर्थसहाय्य इत्यादी प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अर्थसहाय्य वेळेत परत केल्यास शासन व्याजदरात ३ टक्क्यांपर्यंत सवलत देणार आहे. अर्थसहाय्य सुलभरित्या मिळावे याकरीता किसान के्रडीट कार्ड दिले जाणार आहे.कोट बॉक्सकेंद्र सरकारने किसान क्रेडीट कार्ड ही सुविधा आता मासेमारांना मत्स्यव्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी सुरु केली आहे. या योजनेंतर्गत मत्स्य शेतकऱ्यांना प्राथमिक भांडवलाची गरज भागविण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मासेमारांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक मत्स्य व्यवसाय कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा.- अमिता जैनसहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग वाशिम.
मत्स्य व्यवसायासाठी मासेमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:43 PM