लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या नीलेश मोहनलाल जैस्वाल यांच्या निवासस्थानी ४ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लागला असून याप्रकरणी शहर पोलिसांनी ७ लाख ४८ हजार ९१० रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली आहे. यासंदर्भात माहिती देताना शहर पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांनी सांगितले, की ४ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चोरी प्रकरणातील अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ४५७, ३८० भादंविअन्वये गुन्हे दाखल करून तपास हाती घेण्यात आला. दरम्यान, प्रभारी पोलिस उपनिरीक्षक योगेश धोत्रे व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांनी अवघ्या १० दिवसांत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सलमान खान अय्यूब खान (२६), मुजाहिद खान आसिफ खान (२२), जावा उर्फ जावेद जाफर पठाण (२२), आरीफ खान महेबुब खान पठाण (२५) आणि शेख सलमान शेख अकरम (१९) अशा पाच आरोपींना अटक केली आहे. संबंधित चोरट्यांकडून पोलिसांनी सोन्याचे १५८ ग्रॅम दागिने (३ लाख ५५ हजार ३३०), चांदीचे भांडे, दागिने, श्क्किे, देवांच्या मुर्ती (३ लाख ८ हजार ४०) आणि रोख ४५ हजार असा एकूण ७ लाख ४८ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक योगिता भारव्दाज, दीपक घुगे, गणेश सरनाईक, प्रशांत अंभोरे, प्रविण शिरसाट, उमाकांत केदारे, ज्ञानदेव मात्रे, अमोल गिºहे, विठ्ठल महाले, गजानन कºहाळे आदिंनी सहभाग नोंदविला.
७.४८ लाखांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 4:25 PM