.....................
आधार केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम : आधार कार्डात त्रुटी असल्यास ते अपडेट करावे लागते. त्यानुषंगाने आधार अपडेट केंद्र तहसील कार्यालयात सुरू करण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.
............
बॉटलमध्ये पेट्रोल देणे झाले बंद
वाशिम : काही दिवसांपूर्वी पेट्रोल टाकून देशी दारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न एका इसमाने केला होता. या पृष्ठभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर शहरातील पेट्रोलपंपांनी बॉटलमध्ये पेट्रोल देणे बंद केल्याचे दिसत आहे.
................
शेतकरी गटांना मार्गदर्शन
जऊळका रेल्वे : सेंद्रिय शेती पिकविण्याची पद्धत, त्यासाठी आवश्यक असलेले खत, सेंद्रिय शेतमालास उपलब्ध बाजारपेठ, आदींबाबत कृषी विभागाकडून ‘आत्मा’चे जयप्रकाश लव्हाळे यांनी शेतकरी गटांना १२ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन केले.
...................
प्रलंबित मानधन देण्याची मागणी
मेडशी : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कामकाज केलेल्या शंभराहून अधिक कर्मचा-यांना अद्यापपर्यंत मानधन मिळालेले नाही. हे मानधन देण्यात यावे, अशी मागणी संबंधित कर्मचा-यांमधून होत आहे.
............
भूखंडाची खरेदी प्रक्रिया अद्याप ठप्पच
वाशिम : राज्याच्या इतर जिल्ह्यात भूखंडाची शासकीय खरेदी-विक्री सुरू असताना वाशिम जिल्ह्यात मात्र ती बंद आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी दिनेश कडू यांनी शुक्रवारी केली.