लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे.मानोरा तालुक्याला पावसाची दिर्घ प्रतिक्षा होती, चार ते पाच वर्षापासुन पाऊस अत्यंत कमी होत असल्यामुळे सर्वच प्रकल्प कोरडी पडली होती. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह गुराढोराच्या पाणी प्रश्न गंभीर झाला होता, परंतु या वर्षी पावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याने पाटबंधारे विभागाचे प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. तालुक्यात असलेली धरण पैकी पाच धरणे ओव्हर फ्लो होवुन पाच ते सात से.मी.पाणी ओसांडुन वाहत आहे. त्यामध्ये भिलडोंगर वाठोद ,रुई, गिर्डा धानोरा प्रकल्पाचा समावेश आहे. तर इतरही धरणांनी ८० ते ९० टक्केची सरासरी गाठली. आहे त्यात आमदरी ९२.२७ , आसोला ७२.२२ ,कार्ली ९४. ०६ टक्के पाणी साठा झाला आहे. त्यामुळे किमान यावर्षीचा पाणी प्रश्न मिटला आहे.
मानोरा तालुक्यात पावसाची दमदार हजेरीने पाच धरणे ‘ओव्हर फ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:18 PM
मानोरा : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे.
ठळक मुद्देपावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्याने पाटबंधारे विभागाचे प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. पाच धरणे ओव्हर फ्लो होवुन पाच ते सात से.मी.पाणी ओसांडुन वाहत आहे. त्यामध्ये भिलडोंगर वाठोद ,रुई, गिर्डा धानोरा प्रकल्पाचा समावेश आहे.