शिरपूरपासून जवळ असलेल्या रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे मागील १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गजन्य आजार पसरला. १५ दिवसात ७१२ लोकांना कोरोना आजाराची लागण झाली. गावकरी व प्रशासन यामुळे त्रस्त झाले. वाशीम व सवड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान १५ दिवसामध्ये ७१२ पैकी पाच जणांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला, तर १२३ कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली. ५८४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रिसोडचे तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग फोकसे यांनी दिली. गोवर्धनासारख्या अतिलहान गावामध्ये १५ दिवसात ७१२ रुग्ण निष्पन्न झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. गावातील जवळपास सर्वच नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. गावात आरोग्य विभागाची टीम कार्यरत आहे. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असे तहसीलदार अजित शेलार यांनी सांगितले.
१५ दिवसात पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:40 AM