वाशिम :केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्ह्यात (ट्रांसफॉरमेशन आॅफ अॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट) समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. येथे अद्ययावत सोयी, सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच ६७ प्रकारची औषधी संबंधित रुग्णांना घरपोच उपलब्ध करून दिली जाणार आहे.केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्ह्यात वाशिमचा समावेश असून, ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधा अद्ययावत करण्यासाठी निती आयोगांतर्गत विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आयुष्यमान भारत कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरू केले जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये केनवड, किन्हीराजा, शेलुबाजार, आसेगाव व शेंदूरजना या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या आरोग्य केंद्रांत आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे व त्याअनुषंगाने साधनसामुग्री, ६७ प्रकारची औषधी उपलब्ध केली जाणार आहे. वैद्यकीय उपचाराच्या दृष्टिकोनातून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळाही घेतली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांनी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांना योग्य त्या सूचनाही दिल्या.उपरोक्त पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातील कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासह अन्य आजारांवर योग्य ते उपचार मिळण्याच्या दृष्टिकोनातून आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. संशयित रूग्णांचा शोध घेतल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शिबिर घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. रुग्णाना संबंधित आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर योग्य ते उपचार करण्याबरोबरच आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून घरपोच मोफत औषधी दिली जाणार आहे. एकूण ६७ प्रकारची औषधी उपलब्ध राहणार आहे.
-तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सुविधा‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी निवड झालेल्या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांत रुग्णांच्या उपचारासंदर्भात काही अडचण, शंका असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधता यावा याकरीता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासंदर्भातची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.विविध प्रकारच्या तपासण्याही होणारएचआयव्ही यासह विविध आजारासंदर्भात योग्य त्या तपासण्या करण्यासाठी या पाच आरोग्य केंद्रांत अत्याधुनिक उपकरणे तसेच त्या अनुषंगाने तज्ज्ञ मनुष्यबळही उपलब्ध केले जाणार आहे.केंद्र शासनाच्या १११ आकांक्षित जिल्'ात वाशिमचा समावेश आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टिकोनातून ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’साठी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. येथे अद्ययावत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. याशिवाय कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी रुग्णांना आवश्यक ती औषधी आशा स्वयंसेविकांद्वारे घरपोच मोफत दिली जाणार आहे.- डॉ.अविनाश आहेर,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम.