लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय डाक विभागामार्फत एका नविन अनोख्या ‘पंचतारांकित ग्राम योजना’ ची सुरुवात १० सप्टेंबरपासून करण्यात आली आहे. महाराष्टÑातील दहा गावांपासून याची सुरुवात झाली असून त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला जिल्हयातील वडद व वाशिम जिल्हयातील तिवळी या गावांचा समावेश आहे. या योजनेचा शुभारंभ भारत सरकार संचार,शिक्षा आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.या योजनेंतर्गंत अकोला जिल्हयातील वडद व वाशिम जिल्हयातील तिवळी हे गाव शुभारंभ प्रसंगी निवडण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात अकोला व वाशिम जिल्हयातील प्रत्येकी ५० गावांची निवड असे एकूण १०० गावांची निवड करण्यात येणार आहे.भारतीय डाक विभागातर्फे राबविण्यात येणाºया पोस्ट आॅफीस बचत बँक,आवर्ती ठेव, मुदतीठेव यासह सुकन्या समृध्दी योजना, ग्रामीण डाक जिवन विमा, प्रधानमंत्री सुरक्षा / जीवन ज्योती विमा योजना, आयपीपीबी या योजनेची खाते ग्रामीण भागातील नागरिकांना यात सहभागी करुन घेणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
आॅनलाईन पध्दतीने शुभारंभमहाराष्टÑातील १० गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अकोला जिल्हयातील वडद, वाशिम जिल्हयातील तिवळी, कोल्हापूर जिल्हयातील मडिलगे बुद्रूक, सांगली जिल्हयातील संतोषवाडी, सोलापूरमधील आगलावेवाडी आदी गावांचा समावेश आहे.