वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ केल्यानंतर, काही छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनात आले. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाने पडताळणी मोहिम हाती घेतली असता, आतापर्यंत पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळण्यात आले आहेत.ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. वाशिम जिल्ह्यात शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ व कोळंबी या दोन गावांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व गावांतील जवळपास एक लाख ३८ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते. याची टक्केवारी ९९.२८ अशी होती. जिल्हा स्वच्छता कक्षाने शौचालयाच्या छायाचित्रांची पडताळणी केली असता, काही ठिकाणी चुकीचे छायाचित्र अपलोड झाल्याची बाब निदर्शनात आली. त्यामुळे शौचालय छायाचित्र प्रकरणी घोळ निर्माण होऊ नये म्हणून पडताळणी मोहिम हाती घेण्यात आली. त्या अनुषंगाने सर्व छायाचित्रांची पडताळणी केली असता, आतापर्यंत जवळपास ५ हजार छायाचित्र चुकीची आढळून आल्याने सदर छायाचित्रे वगळण्यात आली. शौचालयाऐवजी स्वच्छतागृह तसेच काही ठिकाणी त्याच त्या शौचालयाचे छायाचित्र पुन्हा, पुन्हा अपलोड झाले होते. चुकीचे छायाचित्र वगळण्यात आले असून, पुन्हा अचूक छायाचित्र अपलोड करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:01 PM
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) शासनाच्या संकेतस्थळावर शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ केल्यानंतर, काही छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनात आले. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या जिल्हा स्वच्छता कक्षाने पडताळणी मोहिम हाती घेतली असता, आतापर्यंत पाच हजार शौचालयांचे चुकीचे छायाचित्र वगळण्यात आले आहेत.
ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण १ लाख ३९ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र ‘अपलोड’ करावयाचे आहेत. एक लाख ३८ हजार ९४० शौचालयाचे छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले होते.जिल्हा स्वच्छता कक्षाने शौचालयाच्या छायाचित्रांची पडताळणी केली असता, काही ठिकाणी चुकीचे छायाचित्र अपलोड झाल्याची बाब निदर्शनात आली.