लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही सलग दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने केली. ६ जुलै रोजी पाच ठिकाणची स्थळे हटविण्यात आली आहेत.शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कार्यवाही करण्याकरिता ५ जुलैपासून प्रारंभ करण्यात आला होता. ५ जुलै रोजी पाच ठिकाणी तर ६ जुलै रोजीसुद्धा पाच अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये वार्ड क्रमांक १५ मधील साईबाबा मंदिर तसेच वार्ड क्रमांक २ मधील कासीम साहाब सवारी स्थळ चाँद साहेब व करीम साहेब सवारी स्थळ व अन्य दोन सवारी स्थळांचा समावेश आहे, तसेच दोन ठिकाणी स्थगनादेश असल्याची माहिती आहे. एका ठिकाणचे प्रकरण समितीकडे तर एक प्रकरण प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळे तेथे धार्मिक स्थळ हटविण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले होते. या आवाहनाला शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेदरम्यान प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांची उपस्थिती होती.
दुसऱ्या दिवशीही पाच अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली !
By admin | Published: July 07, 2017 1:22 AM