मागील वर्षी २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनापासून कामरगावात हा नवा पायंडा पाडला गेला असून यंदाही तो कायम होता. यंदा देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने कामरगावत स्थानिक ग्रा. पं.च्या वतीने जयस्तंभ चौक, जुने ग्रामपंचायत कार्यालय व नवीन सचिवालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. हा मान सरपंच या नात्याने स्थानिक सरपंच साहेबराव तुमसरे यांचा असून देखील त्यांनी परंपरा जोपासण्यासाठी यंदा ध्वजारोहणाचा मान माजी सैनिक योगेश चाणेकर, उमेश खंडारे व राजेश घोडसाड यांना दिला. स्वातंत्र्यदिनी माजी सैनिक योगेश चाणेकर यांनी जयस्तंभ चौकात, उमेश खंडारे यांनी जुन्या ग्रा. पं. कार्यालयात, तर राजेश घोडसाड यांनी सचिवालयात ध्वजारोहण केले. मागील वर्षी २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी माजी सैनिक विनोद निमके व विजय कानतोडे यांना हा मान देण्यात आला होता.
कामरगावात माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:47 AM