लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गेल्या दोन आठवड्यात शेतमालाच्या दरात आलेली तेजी मंदावत असल्याचे बाजारभावावरून स्पष्ट होत असून, प्रामुख्याने तूर आणि सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमीत असल्याने बाजारातील आवक मंदावत असल्याचे आक डेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यातील बाजार समित्यांत गत तीन वर्षांनंतर यंदा प्रथमच सोयाबीन आणि तूर या शेतमालास हमीभावापेक्षा अधिक शेतकºयांना मिळत आहेत. सतत नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडणाºया शेतकºयांना चढ्या दरामुळे मोठा दिलासा मिळाला. शासनाने सोयाबीनला ३३९९ रुपये प्रति क्विंटलचे हमीदर घोषीत केले असताना जिल्ह्यात महिनाभरापासून या शेतमालास त्यापेक्षा प्रति क्विंटलमागे ४५० रुपये अधिक दर मिळू लागले होेते. सद्यस्थितीतही या शेतमालाची खरेदी सरासरी ३७०० रुपये प्रमाणे होत आहे. तथापि, यंदा शेतकºयांना या शेतमालाचे दर अधिक वाढण्याची अपेक्षा असल्याने अनेक शेतकºयांनी अद्यापही सोयाबीन विक्रीसाठी काढले नाही. त्यात गेला आठवडाभरापासून या शेतमालाच्या दरात चढउतार होत आहे. सोमवार आणि मंगळवारच्या खरेदीत जिल्ह्यात या शेतमालास सरासरी ३७२५ रुपये प्रति क्विंटलचे दर मिळाले. हीच स्थिती तुरीच्या मालाबाबतही दिसत आहे. शासनाने तुरीला यंदा ५६७५ रुपये प्रति क्विंटलचे दर घोषीत केले असताना गत महिनाभरात या शेतमालाची व्यापाºयांकडून ३७०० रुपयांपेक्षा अधिक अर्थात हमीभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात येत होती. आता मात्र या शेतमालाचे दर गडगडून ५४५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आले आहेत. शेतमालाच्या दरात होणाºया चढ उतारामुळे बाजारातील आवकीवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
शेतमालाच्या दरात चढउतार; शेतकरी संभ्रमीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 2:54 PM