कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भाग हागणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्तपणे उघडयावर शौचालयास जाणा-यांवर कडक कार्यवाही करण्याच्या हेतुने व कारंजाला मिळालेला ओ.डी.एफ. चा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने भरारी पथकाची नियुक्त करण्यात आली आहे. या पथकाला उघडयावर शौचालय करतांनी दिसला तर मुंबई पोलीस अधिनियम १९६१ चे कलम ११५ व ११७ अंतर्गत १२०० रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
तालुक्यात भरारी पथकाच्या नियुक्ती संदर्भात कांरजा पंचायत समिती सभागृह येथे नुकतीच जिल्हा परीषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी नितीन माने व जिल्हा समन्वयक शंकर आंबेकर, प्रदिप सावरकर, गटविकास अधिकारी डि.बी.पवार यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीत उघडयावर शौचालयास जाणाºयावर बंदी घालण्यासाठी व त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्राम सुरक्षादल, पोलीस मित्र व ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच तसेच त्या गावचा बिट जमादार यांच्या मदतीने कारवाई करण्याचे ठरविण्यात आले. कारंजा पचांयत समितीला ओ.डी.एफ चा दर्जा प्राप्त झाल्यामुळे ते टिकविण्यासाठी गावक-यांनी तसेच कर्मचा-यांनी सहकार्य करावे असे सभेला मार्गदर्शन करतांना उप मुख्यकार्यपालन अधिकारी माने यांनी सांगितले. पथकाला उघडयावर शौचालय करतांनी आढळल्यास अश्या व्यक्तीला समज देउन मुंबई पोलीस अधिनियम १९६१ चे कलम ११५ व ११७ अंतर्गत १२०० रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. हे पथक प्रत्येक गावात कोणत्याही वेळी कधी पण जाउन हागणदी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या करीता गावकºयांनी सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समिती कडून करण्यात आले आहे.
ज्या परीसरात नागरीक शौचालयास जातात या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर गुडमार्निंग बुथ तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी गावातील स्वच्छता दुत यांची नेकणुक करण्यात येणार आह.े या बुथकरीता गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सहकार्य करावे.
- डी.बी.पवार , गटविकास अधिकारी