लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ लोककला मंच, नागपूरच्या वतीने १ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोककलावंतांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. लोककलावंतांना राज्यसरकारचे पाच हजार रुपये व केंद्र सरकारचे १0 हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये मानधन मिळायला हवे, कलावंतांसाठी वयाची अट रद्द करावी, कलावंतांना घरकुल मिळाले पाहीजे, एसटी व रेल्वे प्रवास मोफत मिळावा, कलावंतांना विश्रामगृहात आरक्षण मिळावे, कलावंतांच्या पाल्यांना नोकरीमध्ये १0 टक्के आरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चास १ ऑगष्ट रोजी दुपारी १२.३0 वाजता स्थानिक शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून प्रारंभ करण्यात आला. मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात येवून त्याठिकाणी जिल्हाधिकार्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
लोककलावंतांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:18 AM
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ लोककला मंच, नागपूरच्या वतीने १ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर लोककलावंतांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देलोककलावंतांना १५ हजार रुपये मानधन द्यावेकलावंतांसाठी वयाची अट रद्द करावी कलावंतांच्या पाल्यांना नोकरीमध्ये १0 टक्के आरक्षण मिळावे