शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

पात्र विधवा महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:26 PM

Washim News : कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ८ जुलै रोजी दिले.

वाशिम : कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ८ जुलै रोजी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह कृती दलाचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या ५ असून या मुलांना शासनाच्या निर्देशानुसार लाभ मिळवून देण्याची कार्यवाही त्वरित करावी. तसेच एक पालक गमावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. कोरोनामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याबाबत यापूर्वी सूचित करण्यात आले आहे. या महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने सर्व तहसीलदारांशी समन्वय साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. 

१७७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभजिल्हास्तरीय कृती दलामार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सुभाष राठोड यांनी दिली. बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) यांच्यामार्फत एक पालक आणि दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून अशा १७७ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिम