भर जहागिर - कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता आलेख अनेकांची चिंता वाढविणारा असल्याने प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात कठोरता आणली असून जीवनावश्यक प्रतिष्ठाने वगळता इतर बाजारपेठेला सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खुले ठेवण्याची मुभा देत सायंकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत संचारबंदी लागू केली असताना ग्रामीण भागातील अनेक प्रतिष्ठाने रात्री उशिरापर्यंत खुली राहत असल्याने ग्रामीण भागामध्ये बिगीन लाॅकडाऊनची ऐशी की तैशी होताना दिसत आहे.
यासाठी आता ग्रामीण पोलीस प्रशासनाने गस्त वाढविण्याची मागणी पुढे येत आहे.
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मागील दोन दिवसामध्ये लाॅकडाऊनची नव्याने नियमावली अंमलात आणली असल्याने पोलीस प्रशासनाने शहरी भागातील अनेक ठिकाणी विनामास्क, टिबलसीट, मोटारसायकलसह गर्दीच्या ठिकाणावर प्रथम सूचना देत नंतर धडक कारवाई करीत आर्थिक दंड लावण्यात आला .
परंतु * * * * * * * * *ग्रामीण भागातील अनेक गावामध्ये बिगीन लाॅकडाऊनचे धिंदोडे उडवित मास्क न वापरणे,आपली प्रतिष्ठाने रात्री उशिरापर्यंत सुरूच ठेवणे,आपल्या प्रतिष्ठानावर पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येत आसतांना कुठलाही आटकाव न करणे आशा विविध कारणा मुळे * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *ग्रामीण भागातील कोरोणाची विषाणूची साखळी थांबण्याऐवजी वाढण्यास मदत होत आहे.त्यामुळे आता, * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *ग्रामीण भागातील स्थानिक ग्रामपंचायत,पोलिस पाटील,तंटामुक समित्यांनी पुढाकार घेत शासनाच्या ,नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडणे आवश्यक आहे.तेव्हा कुठे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यास हात भार लागेल. कारण हल्ली * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *ग्रामीण भागातील नागरीकांनी कोरोना विषाणू संसर्गाला थांबविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आसल्याचे बोलल्या जाते.