लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी बहुपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, त्याचे संगोपन व्यवस्थीतरित्या होत नसल्याने वृक्षलागवडीचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. गत दोन वर्षांप्रमाणे यंदाह पुन्हा वृक्षलागवड मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचे नियोजनही पूर्ण दिमतीने सुरू आहे. मात्र, ही मोहीम राबवत असताना यापूर्वी लावलेल्यांपैकी किती वृक्ष जगले, त्याचाही आढावा घेणे आवश्यक ठरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन योग्यप्रकारे न झाल्यास संबंधित यंत्रणेतील जबाबदार अधिकारी, कर्मचाºयांवर सक्तीची कार्यवाही व्हायला हवी. नंदकिशोर वनस्कर, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव
सामाजिक वनिकरण, वनविभागाचे वृक्ष संगोपनाकडे दुर्लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 5:43 PM