वाशिम, दि. १५- वन विभागाकडून वृक्ष लागवडीसोबतच संवर्धनावरही विशेष भर दिला जात असून, यासाठी हरितसेना, वन व्यवस्थापन समित्यांसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांंची मदत घेतली जात आहे. ही बाब वृक्षांची संख्या वाढण्याकरिता पोषक ठरत असल्याचे दिसून येत आहे.शासनाने गतवर्षी २ जुलै २0१६ रोजी राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात २.२२ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ७0 टक्के वृक्षांचे संगोपन, संवर्धन करण्यात विविध यंत्रणांना अपेक्षित यश मिळाले आहे, अशी माहिती वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी एस.आर. नांदुरकर यांनी दिली. आगामी तीन वर्षांंत जिल्ह्यात पाच ते सहा लाख वृक्षांची प्रत्यक्ष लागवड केली जाणार असून, त्याच्या संगोपनाकरिता विशेष परिश्रम घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी आगामी काळात विविध उपक्रम हाती घेतले जाणार असून, ते यशस्वीरीत्या पार पाडण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सध्या ह्यग्रीन आर्मीह्ण सदस्यांची ऑनलाइन नोंदणी केली जात आहे.
वृक्ष संवर्धनाकडे वन विभागाचे विशेष लक्ष!
By admin | Published: March 16, 2017 2:55 AM