लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकºयांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या वनशेती उपअभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने जिल्ह्यात ८ हजार रोपांची विक्री शासकीय रोपवाटिकेतून झाली आहे. या अभियानांतर्गत रोप लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात ही योजना राबविण्यात आली. वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या होत्या. या योजनेत मंगरुळपीर येथील शासकीय रोपवाटिकेतून ८ हजार रोपांची विक्री करण्यात आली आहे. शेतीच्या परिघीय क्षेत्राचा व बांधाचा शेतकºयांना जास्तीत जास्त उपयोग करता यावा याकरिता शेतकºयांना वनशेती अंतर्गत लागवडीनुसार अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण खूप अधिक असले तरी, कृषी विभागाकडून निर्धारित दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतील २०० रोपांसाठी लाभार्र्थी शेतकºयांनाच अनुदान देय असणार आहे.
शासनाच्या निर्र्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत ८ हजार रोपांची विक्री करण्यात आली. निर्धारित दोन हेक्टर मर्यादेतील २०० रोपांसाठी लाभार्थी शेतकºयांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे. -शीतल नागरेकृषी अधिकारी(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)