लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या शौचालयाचा मोबदला बँक खात्यात जमा झाल्यानंतर लाभार्थ्यास दोन हजार रुपये लाच मागणाºया लोणी येथील माजी सरपंचासह ग्रामपंचायतच्या शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ अटक केली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायत शिपाई राधेश्याम पांडूरंग हनवते व माजी सरपंच प्रल्हाद आश्रृजी सोनुने यांनी तक्रारदारास दोन हजार रुपये लाच मागितली. यादरम्यान तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या चमुने सापळा रचून शिपायास लाच स्विकारताना जेरबंद केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीदरम्यान यात माजी सरपंच सोनुने देखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे दोघांविरूद्धही कलम ७, १२, १३ (१) (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
माजी सरपंच लाच घेताना चतुर्भूज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 9:39 PM