शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

Washim: वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

By संतोष वानखडे | Published: June 04, 2023 8:53 PM

Washim: विजांचा कडकडाटात रविवारी वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू झाला.

- संतोष वानखडे वाशिम - विजांचा कडकडाटात रविवारी (दि.४) वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला असून, वीज पडून दोन युवकांसह चार जनावरांचा मृत्यू झाला.रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथे शेतकरी संदीप दत्ता काळदाते (३२) हे आपल्या शेतात उभे असताना, त्यांच्या अंगावर वीज पडली. विजेचा प्रवाह इतका होता की, या विजेच्या धक्क्याने त्यांचा चेहरा जमिनीमध्ये घुसल्याची माहिती मृतकाच्या नातेवाइकांनी दिली.

वीज पडल्यानंतर त्यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील नारायण गोविंदा कदम (३०) हे शेतात काम करीत असताना, दुपारी २ वाजताच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत कोयाळी जाधव (ता.रिसोड) येथे वीज अंगावर कोसळून दोन गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे शेतकऱ्याचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले तर चवथ्या घटनेत नंधाना (ता.रिसोड) येथील पांडुरंग निवृत्ती टाले यांच्या मालकिच्या दोन जनावरांवर वीज पडल्याने दोन्ही जनावरे दगावली. यामध्ये एक म्हैस आणि एक बैल होता. पंचनामा करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी पांडुरंग टाले यांनी केली. पाचव्या घटनेत भोकरखेड (ता.रिसोड) येथील ज्ञानेश्वर गोविंदा रंजवे यांच्या मालकिच्या दोन बैलांवर टिनपत्रे उडून पडल्याने दोन्ही बैल गंभीर जखमी झाले.

टॅग्स :washimवाशिमDeathमृत्यू