लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दहावीच्या सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्यूकेशन (सीबीएसई) बोर्डचा निकाल शनिवार, ३ जून रोजी जाहीर झाला. यात जिल्ह्यातील ह्यसीबीएसई पॅटर्नह्णच्या चारही शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, वाशिम येथील हॅप्पी फेसेस द कन्सेप्ट स्कूलची वैष्णवी मानकर आणि जवाहर नवोदय विद्यालयातील मुस्कान आनंद या दोघींनी ९८ टक्के गुण घेत अव्वल क्रमांक प्राप्त केला. ह्यसीबीएसईह्ण १२ वीचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाल्यानंतर दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. संबंधित विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपुष्टात आली. यावर्षी ह्यसीबीएसईह्णची परीक्षा ९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेला वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालय, हॅप्पी फेसेस द कन्सेप्ट स्कूल, रिसोड शहरातील सनराईज इंग्लिश स्कूल आणि रिसोड तालुक्यातील भावना पब्लिक इंग्लिश स्कूल (देगाव) या चार शाळांमधील २६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, ते सर्व उत्तीर्ण झाल्याने, चारही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जवाहर नवोदय विद्यालयातील (स्कूल बेस) मुस्कान आनंद या विद्यार्थिनीने ६०० पैकी ५९० गुण मिळविले; तर हॅप्पी फेसेस स्कूलमधील (बोर्ड बेस) वैष्णवी मानकर या विद्यार्थिनीने ६०० पैकी ५८८ गुण मिळवत जिल्ह्यातून अव्वल क्रमांक प्राप्त केला. "सीबीएसई" परीक्षेत जिल्ह्यातील ४२ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणशनिवारी जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या निकालात वाशिम येथील हॅप्पी फेसेस स्कूलमधील तब्बल २६ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयातील दहा, देगावच्या भावना पब्लिक स्कूलमधील तीन, रिसोडच्या सनराईज इंग्लिश स्कूलमधील चार, अशा एकंदरित ४२ विद्यार्थ्यांचा ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश झाला आहे.
‘सीबीएसई’च्या चारही शाळांचा निकाल शंभर टक्के!
By admin | Published: June 04, 2017 5:31 AM