जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मंगळवारी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये मालेगाव शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील ३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,९२५ वर पोहोचला आहे. मंगळवारी १६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ६६२० जणांनी कोरोनावर मात केली.
००००
१५२ जणांवर उपचार
जिल्ह्यात आतापर्यंत ६,९२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,६२० जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.