वाशिम, दि. 0९ : विजेसंदर्भातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ह्यइन्फ्रा-२ह्ण योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १0२ कोटी रुपयांची कामे होत आहेत. मात्र, कामांची गती अत्यंत संथ असून गत दोन वर्षांत पाचपैकी केवळ एक वीज उपकेंद्र उभे करण्यात महावितरणला यश मिळाले. तथापि, प्रलंबित कामांचा थेट परिणाम आगामी रबी हंगामावर जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. ह्यइन्फ्रा-२ह्ण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध कामे प्रस्तावित आहेत. त्यात शेतकर्यांना ४ हजार ३00 कृषीपंपाचे कनेक्शन दिल्या जाणार होते. प्रत्यक्षात मात्र गेल्या दीड वर्षाच्या काळात केवळ १ हजार ७00 जोडण्या दिल्या गेल्या. १ हजार ५0 रोहीत्रांपैकी आजमितीस केवळ ५00 च्या आसपास रोहीत्र बसविण्यात आले आहेत. कृषीपंपांकरिता लागणार्या एल.टी. लाईनचे २५0 किलोमिटरचे उद्दीष्ट होते. मात्र, त्यापैकी ७0 ते ७५ किलोमिटरच लाईन टाकण्याचे काम उरकण्यात आले. याशिवाय १00 किलोमिटर एस.टी. लाईन टाकण्याच्या कामात वर्षभरात फक्त २५ किलोमिटरचे काम पूर्ण झाले असून ५ वीज उपकेंद्रांपैकी वर्षभरात केवळ १ उपकेंद्र उभे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, सद्या सुरू असलेल्या खरिप हंगामात विनाविज पाणी उपलब्ध होते. मात्र, रबी हंगामात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यास सिंचनाचा मुख्य प्रश्न भेडसावतो, ही बाब लक्षात घेवून प्रलंबित असलेली वीज उपकेंद्रांची कामे तद्वतच विजेसंदर्भातील इतर कामांना गती द्यावी, अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरत आहे.
निर्माणाधिन चार वीज उपकेंद्रांची कामे प्रलंबित!
By admin | Published: August 10, 2016 1:25 AM