सुकांडा येथील शेतकरी पांडुरंग घुगे यांच्या शेतानजीक दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता त्यांना विजेच्या लोंबकळलेल्या तारांखाली रोही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. मृत रोहींच्या शरीरावर अक्षरश: अळ्या पडल्याचे निदर्शनास आले, तर काही रोहीच्या शरीराचे केवळ सांगाडेच घटनास्थळी पडून होते. त्यामुळे रोहींचा मृत्यू जवळपास आठवडाभरापूर्वी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पशू चिकित्सकांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
...............
बॉक्स :
सुकांडा शिवारातील पांडुरंग घुगे यांच्या शेतशिवारात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यामुळे आज सकाळी आम्ही घटनास्थळी जाऊन पाहिले असता विजेच्या लोंबकळलेल्या तारांखाली रोही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. लोंबकळलेल्या तारा दुरुस्त करण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली, मात्र त्याकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्यानेच निष्पाप चार रोहींचा जीव गेला.
उल्हासराव घुगे
माजी सदस्य, पंचायत समिती, सुकांडा