शहरं
Join us  
Trending Stories
1
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
2
नांदेड शहर आणि परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राची माहिती
3
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
4
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
5
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
6
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
7
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
8
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
9
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
10
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
11
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
12
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
13
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
14
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
15
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
16
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
17
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
18
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
19
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
20
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

दिवाळी आणि छट सणानिमित्त सिकंदराबाद-रक्सोल विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या

By दिनेश पठाडे | Published: November 10, 2023 8:38 PM

ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने स्थानिकांची सोय होणार

दिनेश पठाडे, वाशिम: दिवाळी आणि छट सणानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद-रक्सोल दरम्यान विशेष एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या सोडण्याचा निर्णय १० नोव्हेंबरला घेतला आहे. ही गाडी वाशिममार्गे धावणार असल्याने वाशिमकर प्रवाशांची दिवाळी सणात सोय होणार आहे.

गाडी क्रमांक ०७००१ सिकंदराबाद ते रक्सोल ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून १२ आणि १९ नोव्हेंबरला रविवारी सकाळी १०:३० वाजता सुटेल. नांदेड-पूर्णा मार्गे वाशिम येथे रात्री ८:१० वाजता पोहचेल. रक्सोल येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहचेल. या गाडीच्या दोन फेऱ्या होतील. तर गाडी क्रमांक ०७००२ रक्सोल-सिकंदराबाद ही विशेष गाडी रक्सोल येथून १४ आणि २१ नोव्हेंबरला मंगळवारी सायंकाळी १९:१५ वाजता सुटेल.  वाशिम स्थानकावर तिसऱ्या दिवशी सकाळी ३: ५४ वाजता येऊन सिकंदराबाद इथे दुपारी १४:३० वाजता पोहचणार आहे. या गाडीच्या देखील २ फेऱ्या होणार आहेत. सिकंदराबाद-रक्सोल-सिकंदराबाद या गाडीच्या वाशिम मार्गे अप व डाऊन अशा ४ फेऱ्या होणार असल्याने वाशिमातील प्रवाशांना थेट प्रयागराज, वाराणसी, पाटलीपुत्र अशा ठिकाणी जाणे शक्य होणार आहे. ही रेल्वेगाडी अनारक्षित असून गाडीला २२ डब्बे असणार आहेत.

या स्थानकावर आहे थांबणार

सिकंदराबाद-रक्सोल-सिकंदराबाद या विशेष गाडीला बोलारम, मेडचल, अकनापेट, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा, इटारसी, पिपरीया, प्रयागराज चौकी, पं.दीनदयाल उपाध्याय जं.(वाराणसी), बक्सर, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुजफ्फरपूर आणि सीतामढी या स्थानकांवर थांबा असणार आहे.

टॅग्स :washimवाशिम