रिसोड (वाशिम) : येथील आगाराला चार शिवशाही बसेस मिळाल्याने प्रवाशांची मागणी पूर्णत्वास गेली. सदर बसेस रिसोड आगाराला मिळण्यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन राज्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली होती. रिसोड येथून पुणे,नाशिक, नागपूर व इतर ठिकाणी जाण्यासाठी आरामदायी बसेस नसल्याने प्रवाशी खासगी बसेसचा आधार घेत असत. लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी गत कित्येक महिन्यांपासून प्रवाशी करीत आले आहेत. यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, प्रसिद्धी प्रमुख किशोर गोमाशे, कार्यकर्ते एस.पी पल्लोड यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात परिवहन राज्यमंत्री विजयराव देशमुख यांच्याकडे शिवशाही बसेसची मागणी केली होती. त्यावेळी परिवहन राज्यमंत्री देशमुख यांनी रिसोड आगाराला लवकरच बसेस देण्याचे निर्देश महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली असून बुधवारी चार बसेस आगारात दाखल झाल्या. सदर बसेस पुणे, नाशिक या मार्गावर चालविल्या जाणार आहेत. २५ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता या बसेसचा रितसर शुभारंभ करण्यात आला, असे रिसोड आगार व्यवस्थापक स्वप्नील अहिरे यांनी सांगितले आहे.शिवशाही बसेस सुरू झाल्याने प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध झाली आहे.
रिसोड आगाराला मिळाल्या चार शिवशाही बसेस; आजपासून प्रवाशांच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:40 PM
रिसोड (वाशिम) : येथील आगाराला चार शिवशाही बसेस मिळाल्याने प्रवाशांची मागणी पूर्णत्वास गेली. सदर बसेस रिसोड आगाराला मिळण्यासाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन राज्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली होती.
ठळक मुद्देरिसोड येथून पुणे,नाशिक, नागपूर व इतर ठिकाणी जाण्यासाठी आरामदायी बसेस नसल्याने प्रवाशी खासगी बसेसचा आधार घेत असत. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान परिवहन राज्यमंत्र्यांकडे मागणी लावून धरली होती. २५ जानेवारी रोजी सकाळी ८:३० वाजता या बसेसचा रितसर शुभारंभ करण्यात आला.