शिरपूर जैन : शिरपूर फिडरवरील दाब कमी व्हावा म्हणुन शिरपूरच्या ई क्लास जमीनीवर १३३ के.व्ही. विज उपकेंद्र उभारण्यात आले. या उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते मे २०१७ करण्यात आले. परतुं या केंद्रातुन अद्यापही खंडाळा, शेलगाव , वाघी, दापुरी खुर्द फिडरला विज पुरवठाच होवु शकला नाही.
शिरपुर १३३ के.व्ही. विज उपकेंद्रावर मोठा दाब येवुन वारंवार विज पुरवठा खंडीत होणे, ट्रान्सफॉर्मर जळणे, अशा घटना सतत घडत असत. त्यामुळे खंडाळा, वाघी, शेलगाव,दापुरी खुर्द, करंजी, अशा दहा फिडरला सुरळीत विज पुरवठा व्हावा म्हणुन आसेगाव रस्त्यावरील ई क्लास जमीनीवर १३३ के.व्ही. उपकेंद्र खंडाळा उभारण्यात आले. काम पूर्ण न होताच संबंधीत विभागाने उपकेंद्राचे उद्घाटन राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते खा.भावना गवळी, आ.अमित झनक, आ.राजेंद्र पाटणी व विज कंपनीच्या बड्या अधिकाºयांच्या उपस्थितीत १७ मे रोजी करवुन घेतले. मात्र उद्घाटन करुन सह महिन्याचा कालावधी लोटला तरी खंडाळा शेलगाव खवणे, वाघी, दापुरी खुर्द, येथील शेतकºयांना विज पुरवठा करणाºया फिडरला या उपकेंद्रातुन विज पुरवठा होवु शकला नाही. या उपकेंद्रातुन केवळ खंडाळा, गावठाण, वसारी फिडरला कृषीसाठी विज पुरवठा होत आहे.या विषयी मालेगाव येथील अभियंता शरद पांडे यांच्याशी मोबाईलव्दारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाईल रिसीव्ह केला नाही.
खंडाळा १३३ के.व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन हेवुन सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी सुध्दा खंडाळा, वाघी, दापुरी, शेलगाव येथील शेतकºयाना कृषी सिंचनासाठी या उपकेंद्रामार्फत विज पुरवठा होत नाही. ही खºया अर्थाने शेतकºयांची चेष्टा चालवित असल्याचा प्रकार आहे.
- प्रकाश वाघ,माजी सरपचं तथा शेतकरी वाघी बु.