शहरं
Join us  
Trending Stories
1
"केस नसताना कंगवा फिरणारे खूप..."; मुख्यमंत्रि‍पदावरून गडकरींचा मविआच्या नेत्यांना चिमटा
2
व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो; संजय राऊतांच्या विधानाने वाद, माफीची मागणी
3
Sharad Pawar : "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप
4
"त्याला काय करायचंय? विराट-रोहितबद्दल बडबड करण्यापेक्षा पॉन्टींगने..."; गौतम गंभीर संतापला!
5
Maharashtra Election 2024: विधानसभेचा पहिला ओपिनियन पोल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत
7
"मारायला हत्यार कशाला?"; शरद केळकरच्या 'रानटी'चा ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांचा भयंकर खलनायक
8
धर्मयुद्ध, व्होट जिहादवरून ओवैसी संतापले; फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले...
9
रोहित-विराटचं नाही टेन्शन; KL राहुलकडे टॅलेंट! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी काय म्हणाला गंभीर?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'धर्माचं आम्ही बघून घेतो, तुम्ही काय कामं केली ते सांगा'; भावांच्या प्रचारासाठी रितेश देशमुख मैदानात
11
गोलिगत धोका अन् बटनाने टेंगुळ...! रितेश देशमुखची धाकट्या भावाच्या प्रचारात तुफान फटकेबाजी
12
Baba Siddique : ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन?
13
लोकप्रिय अभिनेत्रीच्या घरातील बाथरुमच्या भिंतीत सापडलेले १२ लाख, कोर्टात दिली खोटी साक्ष अन्...
14
वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त
15
न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी
16
'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर...
17
माझे घर नागपूरच, अद्याप मुंबईत स्वत:चे घर नाही; देवेंद्र फडणवीस यांची दक्षिण-पश्चिमच्या मतदारांना भावनिक साद
18
"महायुती १७५ हून अधिक जागा जिंकणार, तर बारामतीत...’’, अजित पवारांचा दावा
19
BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही...
20
मर्डर मिस्ट्री! दिरावर जीव जडल्याने नवऱ्याचा काढला काटा; ८ महिन्यांनी असा झाला पर्दाफाश

चारचाकीची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर; शिरपूर-मालेगावर रोडवरील घटना

By दिनेश पठाडे | Published: December 15, 2023 5:41 PM

शिरपूर येथील विनोद श्रीवास्तव व दगडू मोतीराम बाभणे हे शिरपूर येथून दुचाकीने बँकेच्या कामानिमित्त मालेगाव येथे जात होते.

वाशिम : रिसोड- मालेगाव राष्ट्रीय महामार्ग ४६१ बी वर शिरपूरनजीक एका चारचाकी वाहनाने दुचाकीस मागून जबर धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना  १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. शिरपूर येथील विनोद श्रीवास्तव व दगडू मोतीराम बाभणे हे शिरपूर येथून दुचाकीने बँकेच्या कामानिमित्त मालेगाव येथे जात होते. शिरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावर रिसोडकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच.३० एफ.२४८४ या चारचाकी वाहनाने त्यांच्या एम.एच.३७ एम ४६३४ या दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिल्याने मागे बसलेले दगडू मोतीराम बाभणे (वय ५२) यांना जबर मार लागला, त्यांना उपचारासाठी अकोलाकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारा विनोद श्रीवास्तव (वय ४०)  हा युवक जखमी झाला. दुचाकीस्वारास जबर धडक दिल्यानंतर चार चाकी वाहनाने तेथून पोबारा केला. सदर घटनेची माहिती ऑटो युनियनचे अध्यक्ष कैलास भालेराव यांनी तातडीने शिरपूर पोलिस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच पो.हे.कॉ. अमोल घायाळ, सतीश चव्हाण, प्रवीण सेन्द्रे, विजय बोरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  खासगी रुग्णवाहिकेने जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत. पोबारा केलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे आव्हान शिरपूर पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :washimवाशिम