शेलुबाजार (वाशिम): ग्राहकांची कुठल्याही कामासाठी पैशांची अडचण वेळीअवेळी दूर व्हावी म्हणून विविध बँकांनी एटीएम सेवा सुरू केली; या एटीएममधून सुव्यवस्थीत चलनी नोटा निघणे आवश्यक आहे; परंतु शेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क फाटक्या, जीर्ण झालेल्या आणि रंग चढलेल्या नोटा निघत आहेत. या नोटा व्यवहारांत कोणीही स्विकारणे अशक्य असल्याने खातेदारांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे.विविध बँकेच्या खातेदारांना वेळेवर रक्कम काढून आपली तातडीची अडचण दूर करण्यासाठी बँकांनी एटीएम सेवा सुरू केली. ही सेवा देत असताना निर्धारित विड्रॉल संख्येच्या मर्यादेनंतर खातेदारांकडून शुल्कही वसुल करण्यात येते. पहिल्या पाच विड्रॉलनंतर खातेदाराने त्याचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएम व्यतीरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढल्यास हे शुल्क वसुल केले जाते. या एटीएमची सुरक्षा आणि त्यात रक्कम टाकण्याचे कंत्राट किंवा जबाबदारी बँकांनी विविध कंपन्यांकडे दिली आहे. या कंपन्यांना त्याद्वारे चांगले उत्पन्नही मिळते. त्यामुळे त्यांनी एटीएमधारकांना चांगली सेवा देणे अपेक्षीत आहे. तथापि, असे होताना दिसत नाही. अनेकदा एटीएममध्ये रक्कमच नसते, तर आता एक नवाच प्रकार शेलुबाजार येथील एटीएमधारकांना अनुभवायला मिळत आहे.
शेलुबाजार येथील एटीएममधून निघताहेत जीर्ण, फाटक्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 2:09 PM