लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : येथील वरुड रस्त्यावरील हुडको कॉलनी स्थित अभ्यासा इंग्लीश स्कुल येथे आत्महत्याग्र्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना सत्र २०१७ -१८ पासून मोफत शिक्षण देण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्षांनी घेवून एक समाजसेवेचा नविन ध्यास हाती घेतला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये यासाठी शासन, प्रशासनाच्यावतिने जनजागृती करुन ते थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंंबियाचे घरातील कर्ता गेल्यानंतर काय हाल होतात याचा विचार मनी आल्याने अभ्यासा इग्लिश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम चव्हाण यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंंबातील मुलांना मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला व तसे आवाहनही त्यांनी केले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्याचा अभ्यासा इंग्लीश स्कुलचा मानस आहे. तसेच मोफत शिक्षण सोबत मोफत स्कुलचा मानस आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणासोबत मोफत गणवेष देवुन अशा कुटूंबांचे मनोधैर्य वाढविण्याचे व शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये करिता संस्थेच्या अध्यक्षांनी नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण
By admin | Published: May 21, 2017 7:32 PM