रिसोड : तालुक्यातील वाकद व मोप येथील बाल शिवाजी इंग्लिश स्कूलने देशसेवेमध्ये खारीचा वाटा उचलला असून भारतीय सेनेत सेवा देणाºया जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये नि:शुल्क प्रवेश देणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रविण साखरकर यांनी केली. वाकद , मोप स्थित बालशिवाजी इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. देशसेवेकरिता सर्वस्व अर्पण करणाºया जवानांचा त्याग व बलीदान पाहता देशाकरिता लढणाºया सेैनिकाकरिता आपण सुद्धा काही करावे , या देशसेवेच्या भावनेमधून बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रविण साखारकर यांनी या प्रसंगी भारतीय सेनेमध्ये कार्यरत जवानांच्या पाल्यांना शाळेमध्ये प्रवेश घेताना त्याचेकरिता शुल्क न आकारता प्रवेश नि:शुल्क देण्याचा मानस व्यक्त केला व शाळेबाहेर तसा सुचना फलक लावून पालकांना अॅपव्दारे माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त पालकांपर्यंत या संदर्भातील माहिती पोहचविण्याचे आवाहन यावेळी संस्थाध्यक्ष सारखरकर यांनी केले .
जवानांच्या पाल्यासाठी मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 3:15 PM