या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अजित शेलार होते. भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग फोपसे, पोलीस निरीक्षक एस. एम. जाधव, प्राचार्य विजयकुमार तुरुकमाने, डॉ. जितेंद्र गवळी, तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, शहराध्यक्ष विकास झुंगरे यांची प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी तहसीलदार शेलार म्हणाले की, नेत्र तपासणी शिबिर महत्त्वपूर्ण असून त्यासाठी उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. दृष्टिदान देण्याचे कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे त्यांनी सांगितले. उदयगिरीचे प्रमुख लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात १०० दिवसात १०० व्यक्तींची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे, असे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले. रिसोड येथे नाव नोंदणी केंद्र उपलब्ध असून त्यानिमित्ताने शेतकऱ्यांची मोफत नेत्र तपासणी होत आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्र संचालक महावीर पवार यांनी केले.