- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला परिसर सील केल्यानंतर त्या परिसरात (कन्टेंनमेंट झोन) लावण्यात आलेल्या कठडयाच्या खालून नागरिक मुक्तसंचार करीत असल्याचे ३० जून रोजी दुपारी दिड वाजताच्या दरम्यान दिसून आले. यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी मात्र गप्पामध्ये मश्गुल होते.वाशिम शहरातील अनेक भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण पॉझिटीव्ह आलेला परिसर नगरपरिषदेच्यावतिने सील करण्यात आला आहे. सील करण्यात आलेल्या परिसरात पोलीस कर्मचारी कर्तव्यावर ठेवण्यात आले आहेत. सील केलेल्या परिसरात कोणीही येवू जावू नये याकरिता ही व्यवस्था करण्यात आली आहे. या परिसरातील नागरिकांपासून किंवा या परिसरात जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू नये याकरिता ही खबरदारी घेण्यात आली आहे. परंतु येथील चित्र वेगळेच दिसून आल्याने सील केलेला परिसर केवळ नावापुरताच असल्याचे दिसून आले.वाशिम शहरातील अकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर असलेल्या घरकुलामधील एक महिला पॉझिटीव्ह आढळून आली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील काही जणांना क्वारंटीन कक्षात दाखल करण्यात आले व सदर परिसर सील करण्यात आला .येथे पोलीस कर्मचारी २४ तास कर्तव्यावर रहावा याकरिता छोटासा तंबु उभारुन देण्यात आला आहे. येथे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर तर दिसून येत आहे, परंतु सील करण्यात आलेल्या परिसरात कोणी जात आहे, येत आहे याकडे त्यांचे दुर्लक्ष दिसून आले.सील केलेल्या परिसरात नागरिक पोलीस कर्मचाऱ्यांसमोरुन लावण्यात आलेल्या कठडयांच्या खालून त्या परिसरात शिरत आहे. परंतु या पोलीस कर्मचारी त्यांची साधी विचारणा सुध्दा करताना दिसून येत नाही.
सील करण्यात परिसरातील रहिवाश्यांचा समावेशसील करण्यात आलेल्या परिसरात त्याच भागात राहणारे नागरिक बिनधास्तपणे येणे जाणे करताना दिसून येत आहेत. सील परिसर करण्यात आल्यानतर त्या नागरिकांना आत बाहेर करीत असतांना कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अटकाव करीत नसल्याचे दिसून आले.
संध्याकाळच्यावेळी अनेकजण घराबाहेरअकोला नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सील करण्यात आलेल्या परिसरामधून संध्याकाळच्यावेळी अनेकजण बाहेर पडत असल्याचे या परिसरानजिक राहिलेल्या नागरिकांनी सांगितले. पोलीस अधिक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष देवून हा प्रकार वेळीच थांबविणे गरजेचे असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे.