या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ठराविक ७५ गावांमधील किमान ७५ युवक ‘फ्रीडम रन’मध्ये सहभागी होऊन गावकऱ्यांना आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व गाव सदोदित स्वच्छ ठेवण्यासाठी अपेक्षित संदेश देणार आहेत. यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक युवकाने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून आपल्या गावाच्या विकासासाठी सहकार्य करावयाचे आहे, अशा सूचना देण्यात आल्या.
१८ सप्टेंबर रोजी वाशिम येथे जिल्हास्तरीय ‘फ्रीडम रन’चे आयोजन करण्यात येणार आहे. किमान २०० युवक त्यात सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जन भागिदारी ते जनआंदोलन ही संकल्पना ठेवून युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांनी विविध खेळांमध्ये सहभाग घ्यावा आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे. ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व गावातील इतर सामाजिक संस्था, युवा मंडळ, महिला मंडळ, बचत गटांनीही या उपक्रमात सहभागी होऊन भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत व अनिल ढेंगे यांनी केले आहे.